- Get link
- X
- Other Apps
निसर्गचित्र दृष्टि.
"सुंदर सकाळ आपल्याला सुंदर दिसते.कारण सूर्यप्रकाश. सृष्टीला सजीव आणि देखणं करणं हे त्याचे काम. उन सावल्यांचा आविष्कार फार सुंदर असतो. एखादा बीट आपल्याला त्याच्या कडे ओढत नेतो . आणि आपण त्याला चित्र चौकटीत पकडण्याचा प्रयत्न करतो."
समोरील दृश्याला साद देतो. ते आकार , रंग,रेषा, माध्यम यांचा मिलाफ करून चित्र जन्म घेत. त्यात आपला रियाज , चित्र विचार, आणि अनुभव फार महत्वाचे ठरतात. चित्र भानयायला लागले की आपण थोडे पुढे सरकल्याचा भास होतो.चित्र रचना सुनियोजित रंग यांचा संवाद योग्य झाला की साधे वाटणारे विषय एका उंचीवर जातात. मुळात निसर्ग हाच मुळी आनंदाचा झरा. त्याचे पाण्याची मिठास फक्त जो तहानलेला असतो .तो शोधतो. आणि मग तृप्तीचा आनंद म्हणजेच निसर्गचित्र.
छान!👌👌👌
ReplyDelete